वळूचा हैदोस! शिंगाने आपटलं, पायाने तुडवलं; ज्येष्ठ महिलेची महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज
नागपूर बैल हल्ला : मानवी वस्त्यांमध्ये फिरणारे मोकाट प्राणी नागरिकांच्या, खासकरून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितासाठी किती धोकादायक ठरू शकतात, याच एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रत्यय नागपुरात आलंहे. वंदना देवीकर या 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला, त्या घरासमोर झाडू करत असताना, मोकाट वळुने (Bull Attack) 27 जानेवारी रोजी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गल्लीत फारशी वर्दळ नसताना वळूद्वारे अचानक हल्ला केला. वंदना देवीकर यांच्यावरील हा हल्ला एवढा भयावह होता की त्यात वंदना देवीकर यांच्या शरीराच्या अनेक हाडं मोडल्या गेल्यात्यामुळे, त्यात छातीतल्या बरगड्यासह अनेक हाडं मोडल्या गेल्या. तर मेंदूलाहे गंभीर इजा झाली.
Nagpur Bull Attack : चेष्टीतल्या बरगड्यासह अनेक हाडं मोडल्या, रुग्णालयातील आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज
दरम्यान, या हल्ल्यात मांडीत वळूचे शिंगहे रुतले. तब्बल तीन आठवडे रुग्णालयातील आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, तसेच मेंदूची क्लिष्ट शस्त्रक्रिया होऊन कवटीचा एक भाग कापून काढल्यानंतर ही वंदना देवीकर आजवर शुद्धीवर आलेल्या नाही. गेले एक महिना त्यांनी डोळा उघडलेला नाही, त्या एक शब्दही बोललेल्या नाही. कुटुंबाने लाखो रुपये खर्च करूनही वळूने केलेल्या हल्ल्यातील आंतरिक जखमा ( मेंदूला झालेली इजा) भरून निघालेल्या नसल्यामुळे वंदना देवीकर त्यांच्या घरातच अंथरुणाला खिळून बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांना कुठलीही हालचाल करता येत नाही, डोळा उघडता येत नाही. कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करून तसेच इतर आवश्यक वैद्यकीय यंत्रे घरीच लावून देवीकर कुटुंबीयांनी वंदना यांना कसं तरी जिवंत ठेवले आहे.
Nagpur News : महिना उलटला, प्रशासनाकडून साधी विचारणाही नाही
संतापजनक बाब म्हणजे, 27 जानेवारी रोजी वंदना देवीकर यांच्यावर वळूचा असा हल्ला झाल्यानंतर एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने किंवा नगरसेवकाने देवीकर कुटुंबीयांना भेटून वंदना देवीकर यांची स्थिती जाणून घेण्याचा साधा प्रयत्न ही केलेला नाही. पोलिसांनी फक्त रक्ताने माखलेले वंदना देवीकर यांचे कपडे जप्त करत त्यांच्या तपासाचा सोपस्कार पार पाडला आहे. दुसऱ्या बाजूला हल्ला करणारा वळू अजूनही त्याच भागात मोकाट फिरत असल्याने परिसरातील नागरिक दहशतीत आहे. खूंखार वळूची दहशत आणि महापालिकेचा दुर्लक्ष यासंदर्भात परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.