दीडशेंच्या जमावाने मला घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; पोलीस उपायुक्तांचा थरारक अनुभव
नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घनटेनंतर नागपूरच्या पोलिसांनी (Police) तत्काळ आपली कुमूक मागवून व टीम तैनात करत जमावाला पांगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले. मात्र, या घटनेत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यात, पोलीस उपायुक्तांना चक्क कुऱ्हाडीचा वार सोसावा लागला. कुऱ्हाडीचा वार हातावर झेलमाऱ्या निकेतन कदम यांनी नागपूरच्या हिंसाचार घटनेचा थरारक अनुभव कथन केला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या हिंसाचाराच्या प्रचंड गदारोळात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस उपायुक्तांनी त्यांचा कालचा थरारक अनुभव एक्स्क्लुझिवली एबीपी माझासोबत शेअर केला आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना चित्तथरारक अनुभव कथन केला. पोलिसांनी फक्त परिस्थिती हाताळलीच नाही तर अवघ्या काही तासात नागपूर शांत करून दाखवलं याचा प्रत्यय आपल्याला याची देही याची डोळा घटना अनुभवणाऱ्या पोलिसांच्या कथनातून येतोय.
नागपूरच्या झोन फाईव्हचे उपायुक्त निकेतन कदम हे आपल्या पथकासह एका दगडफेकीतील संशयीताला शोधण्यासाठी एका अरुंद गल्लीत गेले असता, एका घरात संशयीताचा शोध घेत असताना कदम यांच्या 4 ते 5 सहकाऱ्यांना शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने घेरले होते. सर्वांच्या हातात लाठ्या, काठ्या आणि काही धारदार शस्त्र होते. आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी डोक्यावर एक हेल्मेट आणि हातात एक काठी घेऊन निकेतन कदम जमावाच्या दिशेने गेले आणि हातातल्या काठीच्या माध्यमातून बहुतांशी जमावाला त्यांनी नियंत्रितही केले. मात्र, जमावातील एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यामध्ये निकेतन कदम यांचा हात गंभीररीत्या जखमी झाली.
नागपूर पोलीसांची एक टीम आहे, आणि काल संकटाच्या वेळेला ती टीमच मैदानात उतरली होती. त्यामुळे हे कुठल्याही अधिकाऱ्याचं शौर्य नाही, तर नागपूर पोलीस दलाची कर्तव्य परायणता असल्याचे निकेतन कदम म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून नागपूर पोलिसांच्या कामगिरी संदर्भात समाधान व्यक्त करत पाठीवर शाबासकीची थाप दिल्याची माहितीही कदम यांनी दिली. कालची परिस्थिती खूप भयावह होती, चारही बाजूने दगडांचा वर्षाव होत होता, लोखंडी आणि धारदार हत्यारं वापरले जात होते आणि अशात संयम बाळगून संवेदनशीलतेने प्रसंग हाताळावे लागत होते. नागपूर पोलिसांनी ते करून दाखवले अशी भावनाही कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
https://www.youtube.com/watch?v=000jrckwpyu
उपायुक्त शशिकांत सातव यांचाही अनुभव
आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांच्या पायावर मोठा दगड लागल्यामुळे त्यांचाही पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या तेही रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनीही थरारक अनुभव सांगितला. काल कोणत्या दिशेने दगड येईल, तो शरीराच्या कोणत्या भागाला जखमी करेल याची कुठलीही शाश्वती नव्हती. मात्र, पोलीस म्हणून कर्तव्य बजवायचे होते म्हणून आम्ही 20 पावलं पुढे जात होतो, पुन्हा दहा पावले मागे येत होतो. हळूहळू करून आम्ही समोर गेलो आणि दंगल उसळलेल्या भागाला शांत केलं. संशयीतांची धरपकड केली आणि त्यादरम्यानच जखमी झाल्याची भावना शशिकांत सातव यांनी एबीपी माझ्याशी बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.