Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
नागपूर जिल्ह्यातील कानोल्हीबारा मार्गावरील आकार नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने डि.एन.डी.हाईट्स या इमारतीतील फ्लॅटमधुन प्रियकरला व्हिडिओ काॅल करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली. मृतक विद्यार्थीनीचे नाव विध्येश्वरी दिनेशकुमार आपटे असं विद्यार्थीनीचे नाव आहे.. हिंगणा येथील आकार नर्सिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. भोसलेवाडी जवळील डीएनडी हाइट्स या इमारतंमधील फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणी सोबत राहत होती. मागील काही दिवसापासून ती डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी वागत होती. शनिवारला नागपुरातील लक्ष्मी नगर सायंटीफीक सभागृहात महाविद्यालयचा पदवीदान कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला तिच्या मैत्रिणी गेल्या. ती एकटीच घरी होती.याची संधी साधून प्रियकराला व्हिडिओ काॅल करून आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी प्रियकराचे लग्न झाले होते. याच कारणांमुळे तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे
Comments are closed.