Nagpur News – ड्रायव्हिंग शिकणं जीवावर बेतलं, कार विहिरीत कोसळून तीन तरुणांचा मृत्यू

ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादात तीन तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना नागपुरात घडली आहे. बुटीबोरीच्या एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांनी कार विहिरीतून बाहेर काढली.

कारमधील एक तरुण ड्रायव्हिंग शिकत होता. यावेळी तरुणाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. विहिरीतील पाण्यात कार अडकल्याने तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed.