ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी चक्क एबी फॉर्म चोराला; शहर प्रमुखांकडून गंभीर आरोप

नागपूर बातम्या : नागपुरात शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) दोन पदाधिकाऱ्यांमध्ये एबी फॉर्म (AB Form) वरून जोरदार वाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी (Nitin Tiwari) यांनी ठाकरे गटाचेच महानगर प्रमुख किशोर कुमेरिया (Kishor Kumeriya) यांच्यावर चक्क पक्षाचा एबी फॉर्म चोरल्याचा आरोप केला आहे. तिवारी यांचा दावा आहे की, कुमेरिया यांना पक्षाने प्रभाग 28 मधून ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे ओबीसी प्रवर्गासाठीचा एबीप फॉर्म कुमेरिया यांना पक्षाकडून देण्यात आला होता. मात्र, कुमेरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊन खुल्या प्रवर्गासाठीच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यानतिवारी यांचा आरोप आहे की कुमेरिया (Nagpur Shivsena UBT) यांना पक्षातील कुठल्याच नेत्याने खुल्या प्रवर्गासाठीचा एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे कुमेरिया यांनी प्रभाग 28 मधील खुल्या प्रवर्गासाठीच्या जागेचा एबी फॉर्म चोरला असून पक्षाने त्याची चौकशी करावी, अशी मागणी ही केली आहे.

Nagpur Shivsena UBT: एबी फॉर्मच्या वाटपावरून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद टोकाला

दुसरीकडे, या आरोपांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांनी एबीपी माझाशी बोलताना अभिप्राय देत हे सर्व दोष फेटाळून लावघ्या आहे. पक्षाने मला प्रभाग 28साठी एबी फॉर्म दिला, मात्र मी वरिष्ठ असल्याने मी कोणत्या जागेवरून लढावं (ओबीसी की ओपन), हा माझा प्रश्न आहे. पक्षाने मला या संदर्भात कुठलाही आदेश दिला नसल्याचा खुलासाकिशोर कुमेरिया यांनी केला आहे.

किशोरकुमारिया: मी वरिष्ठ असल्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची ते मला स्वातंत्र्य

किशोर कुमेरिया यांना पक्षाने प्रभाग 28 मधून ओबीसी वर्गासाठीच्या जागेवरून लढण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज खुल्या वर्गासाठीच्या जागेवरून भरला आणि त्यासाठीचा एबी फॉर्म किशोर कुमेरिया यांनी चोरला असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केला होता. त्यानंतर कुमेरीया यांनी हा खुलासा केला आहे. मला पक्षाचे निरीक्षक विजय कदम यांनी एबी फॉर्म दिला. मात्र मी वरिष्ठ असल्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची तो स्वातंत्र्य मला होतामअसा अफलातून दावाही कुमेरिया यांनी केला. पक्षीय पातळीवर या संदर्भात कुठलाही समन्वय नव्हता असा खळबळजनक वक्तव्यही कुमेरिया यांनी केलं आहे. पक्षाने मला याच कॅटेगरीमधून लढावं, असं कुठलाही आदेश दिला नव्हता. मी कोणत्या जागेवरून लढावं असं मला स्वातंत्र्य आहे. असेही ते म्हणाले.

किशोर कुमारिया: मी नाहीनिष्ठ शिवसैनिक, गरज वाटल्यास खुशाल चौकशी करावी

मी नाहीनिष्ठ शिवसैनिक आहे. नागपुरात चार टर्मपासून मीच निवडून येतोहे. ज्याची जेवढी क्षमता तो तसेच आरोप करणार. मी माझ्या नगरसेवकाच्या चार टर्म पैकी दोन टर्म ओबीसी आरक्षणमधून, तर दोन टर्म खुल्या वर्गातून लढलो आहे. यंदा मला खुल्या वर्गातून निवडणूक लढवायची होती. पक्षाने गरज वाटल्यास खुशाल चौकशी करावी. असेही किशोर कुमेरिया यावेळी म्हणाले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.