Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे हा माणूस संवाद साधण्यासाठी चांगला आहे, सभागृहातही पॉझिटिव्ह असतो… हे कौतुकाचे उद्गार आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे. संजय राऊत यांनी आतापर्यंत भाजपच्या नेत्यांवर अनेकदा आसूड ओढले आहेत, आपल्या शैलीत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राऊतांनी बावनकुळेंचं कौतुक केल्याने आता त्याची चर्चा रंगल्याचं चित्र आहे.
चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस आहे. इतर पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत असं संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले अंबादास दानवे यांनीदेखील बावनकुळेंचं कौतुक केलं. बावनकुळे हे पॉझिटिव्ह आहेत, सभागृहात कधीही नकारात्मक भूमिका घेत नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा पठणासंबंधी नियोजन बैठकीमध्ये सर्व नियोजन करण्यात आलं, मात्र त्याचवेळी या चर्चेदरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं केलेल्या कौतुकाबद्दल आता राजकीय चर्चा रंगल्याचं दिसून येतंय.
येत्या 18 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपुरातील राम मंदिर परिसरात सामूहिक रामरक्षा पठण आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरबाहेर सभा घेण्याचे नियोजन आहे.
Comments are closed.