Nagpur Violence – सायबर पोलिसांकडून 4 FIR ची नोंद, फहीम खानसह सहाजणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपूरमधील हिंसाचारप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांकडून 4 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी फहीम खान याच्यासह सहाजणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचारप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. आरोपी फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखीही आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलीस उपायुक्त मतीन म्हणाले.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये चार एफआयआर दाखर करण्यात आले आहेत. पहिल्या एफआयआरनुसार, औरंगजेब विरोधात जे आंदोलन झाले होते त्या आंदोलनाचा व्हिडिओ लोकांनी तयार केला होता. दंगल घडवण्यासाठी त्यांनी व्हिडिओवर चुकीची माहिती देऊन तो व्हायरल केला होता. त्यामुळे दंगल घडली. त्या अनुषंगाने ज्या-ज्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. आणखी एक एफआयआर दाखल केलेला आहे. यात दंगलीत पोलिसांवर दगडफेक करण्यात आली त्याचा व्हिडिओ बनवून तो पसरवला गेला. त्यानंतर आणखी हिंसाचार उफळला. तिसऱ्या एफआयआरमध्ये हिंसाचारावर टीका-टिप्पणी करण्यात आली. आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौथ्या एफआयआरमध्ये ज्यांनी हिंसाचारचं समर्थन केलं आणि त्यावर वेगवेगळी टिप्पणी केली. तसेच हिंसाचार वाढवण्यासाठी त्यांनी ‘सर तनसे जुदा…’ अशा काही पोस्ट व्हायरल केल्या, अशी धक्कादायक माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.

हिंसाचार प्रकरणातील सगळ्यांची माहिती मिळवण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबला पत्र लिहिले आहेत. आज त्यांची माहिती मिळू शकेल. या संदर्भातील 50 टक्के आक्षेपार्ह पोस्ट या डिलिट करण्यात आलेल्या आहेत. उरलेल्या पोस्ट डिलिट करण्याचे काम सुरू आहे. एफआयआर दाखल केल्यानुसार 50 च्या आरोपी झाले आहेत. व्हायरल पोस्टवरून कारवाई सुरू असून आरोपींमध्ये आणखी वाढ होईल. कारण आणखी 200 वादग्रस्त पोस्ट आयडेन्टिफाय झाल्या आहेत. बांगलादेश कनेक्शन असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. कारण त्याचा तपास सुरू आहे. जर कोणी प्रोफाइलमध्ये कुठल्या देशाचं नाव लिहिलं असेल तर ते खरं आहे की खोटं आहे? याचा तपास केला जातोय. चादरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याचाही तपास सुरू आहे. प्रायव्हेट व्हॉट्सअॅप ग्रुपचंही पोलिसांकडून मॉनिटरिंग सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Comments are closed.