नायगाव बीडीडी पुनर्विकास, दोन इमारतींना घरे रिकामी करण्याची नोटीस; रहिवासी पार्किंग, भाडेवाढीवर ठाम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जुनी बीडीडी चाळ क्रमांक 7 व 13 अ च्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस म्हाडाने बजावली आहे. मात्र म्हाडाने आधी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात व पुनर्विकासाला सुरुवात करावी, यावर रहिवासी ठाम आहेत.

पोलीस वसाहतीच्या इमारती पाडून तेथे नवीन टॉवरचे काम सुरू झाले आहे. बीडीडी चाळ क्रमांक 7 व 13 अ या दोन्ही इमारती पोलीस वसाहतीच्या शेजारी आहेत. नवीन टॉवरच्या कामामुळे या इमारतींना हादरे बसत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी घरे रिकामी करावीत, अशी नोटीस म्हाडाने बजावली आहे. याचा येथील रहिवाशांनी जाहीर निषेध केला आहे.

आम्ही आमच्या मागण्यांचे निवदेन गेल्यावर्षी सर्व लोकप्रतिनिधी व म्हाडाला दिल्या आहेत. यातील प्रमुख मागणी एका घरामागे एक पार्किंग द्यावी ही आहे. तसेच खेळाचे मैदान एका बाजूला न ठेवता सर्व टॉवरच्या मध्यभागी असावे. 35 हजार रुपये दरमहा भाडे देण्यात यावे, अशादेखील रहिवाशांच्या मागण्या आहेत. याचे अद्याप काहीच उत्तर आम्हाला म्हाडाकडून मिळालेले नाही. या मागण्या पूर्ण केल्यावरच आमचा पुनर्विकास करावा, अशी रहिवाशांची आग्रही भूमिका आहेत.

ठिकठिकाणी बॅनर

विकास पुरुष देवाभाऊ यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे बॅनर रहिवाशांनी चौकाचौकात लावले आहेत. बीडीडी चाळ क्रमांक 6 च्या पटांगणात म्हाडाच्या नोटीसवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे घटना करण्यात आले होते. यामध्ये बॅनर लावून प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यावर सर्वांचे एकमत झाले.

Comments are closed.