इन्स्टाग्रामवर मित्राच्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला, टोळक्याकडून मॉब लिंचिंग, नालासोपाऱ्यात तरु
नालासोपारा : नालासोपारा पूर्व मोरेगाव येथे इंस्टाग्रामवर प्रेयसीला अश्लील मॅसेज पाठवल्याच्या रागातून एका तरुणाची मित्रांनीच मॉब लिंचिंग करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रतीक वाघे (वय 24 ) असे मृत तरुणाचे नाव असून, भूषण पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपी हा व्यायाम पट्टू आहे. प्रतीक आणि भूषण हे दोघेही तीन वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. दोघेही पूर्वी मिरारोडच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. प्रतीक सध्या तेथेच कार्यरत होता, तर भूषणने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. प्रतीकने भूषणच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील मॅसेज पाठवल्यानंतर, भूषणने हा राग मनात धरला. 24 ऑगस्टच्या रात्री त्याने प्रतीकला मोरेगाव येथे बोलावून घेतले व ग्रुपसह बेदम मारहाण केली.
मारहाणीत प्रतीक गंभीर जखमी
या हल्ल्याचा व्हिडिओ आरोपींनीच काढला व तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत प्रतीक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रतीकचा आज सकाळी मृत्यू झाला.तुळींज पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेला वाद अखेर मॉब लिंचिंगच्या घटनेत बदलला आणि त्यात एका तरुणाला प्राण गमवावा लागला.
तो अर्थमेला झाला होता
ग्रुपकडून मारहाण झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत प्रतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला इतकं मारलं होतं की, तो अर्थमेला झाला होता. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तरुणीचा प्रियकर भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. शिवाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मेसेजमुळे प्रियकराला राग आला
इन्स्टाग्रामवर प्रतीकने भूषणच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील मॅसेज पाठवल्यानंतर भूषण भयंकर राग आला. मेसेज का पाठवला याचा जाब विचारण्याचा मानस त्याने केला. शिवाय त्यासाठी त्याने आपल्या काही मित्रांना सोबत घेतलं. मेसेज पाठवला होता त्या प्रतीकला त्यानं गाठलं. आपल्या साथीदारांसोबत त्याला बेदम मारहाण केली.
आणखी वाचा
Comments are closed.