नालासोपाऱ्यामध्ये घराला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली

नालासोपारा पूर्वेतील नऊ मजली इमारतीमधील बंद घराला बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले. घरात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
नालासोपारा पूर्वेत लंबोदर अपार्टमेंट ही नऊ मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नवव्या मजल्यावरील एका बंद घरात आगीचा भडका उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील रहिवासी बाहेरगावी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.