जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीत बदललं; काही दिवसांपूर्वी धुराडा पेटू देणा


सांगली: जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे (Rajarambapu Patil Sugar Factory) नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती समोर आली आहे. ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ (Raje Vijaysingh Dafale Sugar Factory) असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावला आहे. काही दिवसांपूर्वी जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा (Rajarambapu Patil Sugar Factory)  यंदा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता.

Raje Vijaysingh Dafale: कोण आहेत राजे विजयसिंह डफळे?

राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते (इ.स. १९२८-१९४८) आणि त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली आहे. यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा (Raje Vijaysingh Dafale Sugar Factory) ही समावेश होता. राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करून उभा केला होता.(Rajarambapu Patil Sugar Factory)

Rajarambapu Patil Sugar Factory: कारखान्याचे नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती

राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा तपास सुरू आहे.

Rajarambapu Patil Sugar Factory: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही

जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू, प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.

Rajarambapu Patil Sugar Factory: जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे. कारखाना ढापण्यात आला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका आता गोपीचंद पडळकर यांनी  यंदा राजरामबापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देत जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.