सचिनला क्लीन बोल्ड करत इतिहास रचणारा नामिबियाचा डॉक्टर आता देशाचा क्रिकेट अध्यक्ष, सेहवागलाही केलं होत आऊट

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताचा दुसरा सामना आज (गुरूवार, १२ फेब्रुवारी) नामिबियाविरुद्ध आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ याआधी २००३ वनडे विश्वचषक आणि २०२१च्या टी२० विश्वचषकात समोरा-समोर आले होते. दोन्ही सामने भारताने जिंकले होते. प्रश्न हा नाही की कोण उत्तम प्रश्न हा आहे की सचिन तेंडुलकरची विकेट घेणाऱ्या नामिबियाच्या डॉक्टर माहित आहे का. तो सध्या नामिबियाचा क्रिकेट अध्यक्षही आहे.

नामिबियाच्या रुडी वॅन वुरेन (Rudi van Vuuren) हे नामिबियाचे क्रिकेटपटू असून ते डॉक्टर, वाईल्ड-लाईफ फोटोग्राफर, रग्बी खेळाडू आणि अध्यक्षही आहेत. ५३ वर्षाचे वुरेन सध्या नामिबियाचे क्रिकेट अध्यक्ष असून त्यांनी एकाच वर्षात दोन खेळांच्या विश्वचषक स्पर्धा खेळल्या होत्या. यामुळे ते जास्तच चर्चेत आले होते. त्यांनी २००३मध्ये क्रिकेटचा वनडे विश्वचषक आणि रग्बी विश्वचषक खेळताना नामिबियाचे प्रतिनिधित्व करत इतिहास रचला.

वुरेन यांनी २००३च्या क्रिकेट विश्वचषकात सचिन तेंडुलकरला बाद करत चर्चेत आले होते. नामिबियाविरुद्धच्या त्या सामन्यात सचिन १५२ धावांची खेळी करुन बाद झाला. त्यावेळी वुरेनने त्याला क्लीन बोल्ड केले होते.
त्या विश्वचषकात वुरेनने केवळ सचिनलाच नाहीतर विरेंद्र सेहवागलाही बाद केले होते. त्या सामन्यात त्याने आधी सेहवागची विकेट घेतली होती. यामध्ये त्याने १० षटकात ५३ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या.

वुरेन यांनी दक्षिण आफ्रिकेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष हेज गीनगोब यांचे ते डॉक्टर होते.

वुरेन यांनी त्या विश्वचषकानंतर नामिबियासाठी एकही क्रिकेटचा सामना खेळला नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्या वनडे सामन्यांमध्ये त्यांनी ८ विकेट्स घेतल्या. त्या विकेट्सपैकी एक सचिनची होती हे महत्वाचे.

वुरेन यांनी मग क्रिकेटचा प्रसार वाढवण्यासाठी काम केले. भारत-नामिबिया आता पुन्हा एकदा विश्वचषकात आमने-सामने आले आहेत.

Comments are closed.