Nana Patekar – नाना पाटेकर यांचं खरं नाव, शिक्षण ते कौटुंबिक पार्श्वभूमी; जाणून घ्या एका क्लिकवर
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यात निधन झाले. पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 75 वर्षांचे होते. नाना पाटेकर यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येणाऱ्या डोणजे गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
नाना पाटेकर यांनी सत्तरच्या दशकापासून ते आतापर्यंत जवळपास 50 वर्षे चित्रपटसृष्टी गाजवली. सुरुवातीच्या काळात खलनायक साकारणाऱ्या नानांनी नंतरच्या काळात विनोदी भूमिकाही उत्तम वठवल्या. चपखल अभिनय, संवाद आणि टायमिंगच्या जोरावर नानांनी मोठा पडदा गाजवला. चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातही त्यांना आपल्या कामाचा ठसा उमटवला. ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना करत त्यांनी जलसंधारणाची कामाला हातभार लावला.
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला होता. नानांचे पूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. मुरुडमध्येच त्यांचे बालपण गेले.
Nana Patekar Top 10 Movies – ‘परिंदा’ ते ‘नटसम्राट’… नाना पाटेकर यांचे गाजलेले चित्रपट
नाना पाटेकर यांचा जन्म व्यापारी कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता. नानांची आई गृहिणी होत्या. त्यांना अशोक आणि दिलीप असे दोन भाऊ आहेत. नानांच्या पत्नीचे नाव नीलकांती असे असून त्या बँक अधिकारी होत्या. 1978 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. नाना आणि नीलकांती या दाम्पत्याला दोन मुलं होती. यातील एका मुलाचे निधन झाले असून दुसऱ्या मुलाचे नाव मल्हार असे आहे. कौटुंबिक कारणांमुळे नाना आणि त्यांची पत्नी नीलकांती हे वेगळे राहत होते.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मुंबईची वाट धरली. नानांनी मुंबईतच आपले शिक्षण पूर्ण केले. समर्थ विद्यालय येथे त्यांना प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांनी वांद्रे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले, ज्याचे नाव आता एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट आहे. तसेच ते सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून पदवीधर होते.
नाना पाटेकर यांचा पहिला चित्रपट ‘गमन’ हा होता. 1978 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर त्यांनी एकामागोमाग हिट चित्रपट दिले. त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार, 2 फिल्मेफेअर पुरस्कारही मिळाले होते. 2013 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
नाना पाटेकरांचे देशप्रेम! कारगिलच्या युद्धात लष्करासोबत सीमेवर बजावले होते कर्तव्य
Comments are closed.