मला आधी वाटायचे फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतले जातात… नानांचे ते भाषण होतेय व्हायरल
‘क्रांतिवीर’साठी नाना पाटेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार अभिनेते दिलीप कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना नाना यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण केले होते.
भाषणात नाना म्हणाले, या क्षेत्रात येण्यापूर्वी मला वाटायचे की फिल्मफेअरसारखे पुरस्कार विकत घेतले जातात, परंतु जेव्हा माझ्यासारख्या एका वेगळ्या धाटणीच्या आणि सामान्य चेहऱयाच्या अभिनेत्याला हा मुख्य प्रवाहातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तेव्हा माझा हा भ्रम दूर झाला.
मी दिग्दर्शित केलेल्या ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘कोहराम’ या तीन चित्रपटांत नाना पाटेकर यांनी काम केले होते. चित्रपटांचे यश आणि अनेक पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांच्या वागण्यात कधीच बदल झाला नाही. त्यांनी गरीब आणि शेतकऱयांना मोठी मदत केली. त्यांचे नाव नेहमीच स्मरणात राहील. – मेहुल कुमार, दिग्दर्शक
Comments are closed.