नाना पाटेकरांना तिकीट बारीवर ‘वनवास’
नाना पाटेकरांच्या ‘वनवास’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून नानांना तिकीट बारीवर ‘वनवास’ पाहायला मिळत आहे. कौटुंबिक ड्रामा असलेला ‘वनवास’ 20 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘पुष्पा 2 ः द रुल’ आणि ‘मुफासा ः द लायन किंग’ या चित्रपटांची व्रेझ असल्याने ‘वनवास’ला फटका बसल्याचे दिसते. नाना पाटेकरांच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 60 लाख रुपयांचा व्यवसाय केला. ‘वनवास’मध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांची झलक असल्यामुळे चित्रपट अधिक गाजेल असे अपेक्षित होते. उत्कृष्ट अभिनय, ‘वनवास’ची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक या सर्व गोष्टी असूनही ‘वनवास’ला फारसे यश मिळवता आले नाही.
Comments are closed.