परभणीतली घटना सरकारपुरस्कृत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

परभणीतली घटना ही सरकारपुरस्कृत होती अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणू असेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, परभणीतली घटना ही सरकारपुरस्कृत होती. आणि स्वतःला वाचवण्यासाठी सरकार खोटं बोलत आहे. इथे आल्यानंतर आम्हाला सत्य परिस्थिती कळाली. आज आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असेही पटोले म्हणाले.

Comments are closed.