पार्थ पवारांच्या वक्तव्याबाबत विचारताच नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, ‘कोणाचा
Parth Pawar Congress: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्यानंतरही आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणुकीत (Baramati Bypoll 2026) पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला होता. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती. पार्थ पवार यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करुन प्रत्युत्तर दिले.(Maharashtra Politics news) त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Nana Patole On Parth Pawar: पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, खरंतर निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे, त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केलेला आहे. अशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचा काही कारण नाही, असं पटोले म्हणालेत. तर पार्थ पवारांच्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ते वेळ सांगेल, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, त्यामुळे मला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचीच नाही.
Congress On Parth Pawar: काँग्रेसने पार्थ पवारांना दिलेलं उत्तर
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सोशल मिडीया एक्सवरून पार्थ पवारांचं नाव न घेता पोस्ट शेअर करत म्हटलंय की, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?”, असं म्हणत काँग्रेसने उत्तर दिलं आहे.
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ?
स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत…
— महाराष्ट्र काँग्रेस (@INCMaharashtra) 6 एप्रिल 2026
Parth Pawar news: पार्थ पवार नेमकं काय म्हणाले?
माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय.
लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटलं.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.