लाचखोर अधिकाऱ्याकडे वाहतूक शाखेचा पदभार
२३ जानेवारी २०२५ रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी हायवा मालकाकडून १७ हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर त्यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अनेक पोलीस निरीक्षक पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असताना आज पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे दीर्घ रजेवर जाणार असल्याने त्यांच्या जागी लाचखोर भागवत नागरगोजे यांची नियुक्ती केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
मागच्या महिन्यात मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात निलंबित परवाना नूतनीकरणासाठी राजेंद्र ढेरंगे यांनी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच नांदेड पोलिसांनी लाचेच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले कुंडलवाडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांना नांदेड वाहतूक शाखेचा पदभार सोपविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंजगाव वाळू डेपोवरून कायदेशीर परवानगी असताना हायवा मालकाकडून कुंडलवाडी ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व नारायण शिंदे या पोलीस उपनिरीक्षकाला १७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. २३ जानेवारी २०२५ रोजी हा सापळा रचण्यात आला होता. २७ जानेवारी रोजी नागरगोजे व शिंदे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. नांदेड उत्तर भागाचे वाहतूक शाखेचे निरीक्षक साहेबराव गुट्टे हे दीर्घ रजेवर जाणार असल्याने व त्यांची रजा आजपासून सुरू होणार असल्याने त्यांच्या जागेवर वादग्रस्त सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षात अनेक निष्णात पोलीस निरीक्षक पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असताना लाच प्रकरणात वादग्रस्त ठरलेले सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांची आज नियुक्ती करण्यात आली.
साहेबराव गुट्टे व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नागरगोजे यांना पदभार देण्यात आला व त्यांचे स्वागतही करण्यात आले. नांदेड उत्तर व वजिराबाद भाग हा शहराचा महत्त्वाचा भाग असताना व अनेक चांगले पोलीस निरीक्षक पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असताना सहायक पोलीस निरीक्षकास हा पदभार देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. दबंग पोलीस अधीक्षक म्हणून अबिनाशकुमार यांचा बोलबाला असताना त्यांनी नागरगोजे यांची ही नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरगोजे हे एका माजी आमदाराचे जावई असून, राजकीय दबावामुळे त्यांची ही नियुक्ती झाली की काय, असा प्रश्न निर्माण झाल्याने नागरगोजे यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
भ्रष्ट पोलीस अधिकारी भागवत नागरगोजे यांच्याकडे नांदेड वाहतूक शाखेचा पदभार
यापूर्वी लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले एपीआय भागवत नागरगोजे यांच्याकडे नांदेड वाहतूक शाखेचा कार्यभार दिल्यामुळे नांदेडमध्ये वाद राजकीय दबावापोटी उपस्थित केलेले प्रश्न. सामना वर अधिक वाचा.
Comments are closed.