आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उच

Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. शिवाय गावात बेइज्जत करतो अशी धमकी देखील दिली. याच भीतीपोटी एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नांदेड (Nanded News) शहरालगत असलेल्या सुगांव येथे घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन प्रभू शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन शिंदे या तरुणाचे थुगांव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. तीन ते चारवर्षा पूर्वी दहावीत शिकत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एक वर्षापूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबाबत माहिती झाली. यावेळी दोघांची घरच्यांनी समजूत काढली होती.

तरुणाला धमकी देत मारहाण

सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या चुलत भावाने मुलीला फोनवर का बोलतो, असे म्हणत नितीन याला मारहाण केली होती. त्यानंतर 18 मार्च रोजी तो कामावरून घरी परतत असताना मुलीच्या घरच्या लोकांनी त्याला पुन्हा मारहाण केली. आम्ही देशमुख आहोत, तुम्ही पाटील आहात, तुमची औकात नाही, रस्त्यावर आणून बेईज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी देखील त्याला देण्यात आली.

मुलीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

या भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी राहत्या घरी सिलिंगला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रभू शिंदे यांच्या तक्रारीवरून ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यासह मुलीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलाने आत्महत्या केल्याने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहत.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Hinjwadi Bus Fire: हिंजवडीतील बसला आग लावलेल्या चालकानं पगार थकवल्याचं सांगितलं कारण; कंपनी मालकाने केला मोठा खुलासा, म्हणाले, ‘सर्व पैसे…’

Father kills son: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्…

अधिक पाहा..

Comments are closed.