ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड हादरलं; विवाहित मुलीसह प्रियकराला हात बांधून विहिरीत फेकलं, दोघांचा मृत्यू

ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. पित्याने विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला हात बांधून विहिरीमध्ये फेकून दिले. यात दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर आरोपी पित्याने स्वत: पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी कमळे ऊर्फ सुरवणे (वय – 19, मूळ रा. बोरजुनी) हिचे एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या तरुणाशी लग्न झाले होते. लग्नाआधीपासूनच तिचे लखन बालाजी भंडारे (वय – 19) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघे संपर्कात होते. 24 ऑगस्ट रोजी सासरचे लोक बाहेर गेल्याची संधी साधत संजीवनीने प्रियकराला घरी बोलावले. यानंतर दोघेही घरामध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले. दोघांना रंगेहाथ पकडत सासरच्यांनी संजीवनीचे वडील मारुती सुरवणे यांना फोन लावून बोलावून घेतले.
Comments are closed.