आचलच्या भावांनी सक्षमला बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, तेव्हा घरच्यांना अर्थ समजला नाही पण.


नांदेड क्राईम लव्ह स्टोरी: नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी सक्षम ताटे या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधांना आचलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. आचल हिचे कुटुंबीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात गुरुवारी सक्षम ताटे (Saksham Tate) याला गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी-दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या (Murder news) केली होती. याप्रकरणात आता दररोज नवनवीन पैलू समोर येताना दिसत आहेत. सक्षम ताटे याच्या आईने आचलचे वडील गजानन मामीडवार आणि भावांवर गंभीर आरोप केले आहेत. आचलच्या भावांनी मध्यंतरी सक्षमला फक्त काटे असलेले गुलाबाचे झाड भेट म्हणून दिले होते. तेव्हाच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते, असे सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले. (Nanded Murder news)

सक्षमचा वाढदिवस होता तेव्हा त्याच्या अनेक मित्रांनी त्याला पुष्पगुच्छ भेट म्हणून दिले होते. मात्र, आचलचे वडील आणि भावांनी सक्षमला गुलाबाचं फक्त काटे असलेले झाड भेट म्हणून दिले होते. हे झाड जोपर्यंत हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील, असे आचलचे कुटुंबीय तेव्हा सक्षमला म्हणाले होते. आचलचे भाऊ आपण सक्षमचे जिगरी मित्र असल्याचे दाखवायचे. त्यांनी वाढदिवसाला सक्षमला काटेरी झाड दिलं तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ समजला नव्हता. पण आचलच्या भावांनी तिला सांगितले की, आम्हाला याचा काटा काढायचा आहे, म्हणून आम्ही सक्षमला काटेरी झाड दिले. त्यानंतर त्यांनी खरोखरच माझ्या मुलाला मारले. त्यांनी कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सक्षम ताटे याच्या आईने केली.

आमचा सक्षम हा गुन्हेगार नव्हता. मामीडवार कुटुंबीयांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते, असा दावाही सक्षमच्या कुटुंबीयांनी केला होता. आचलच्या भावांनी आमच्यासमोर सक्षमला चहा प्यायला बोलावून नेले. तो जात नव्हता तरी त्याला जबरदस्ती नेले. सक्षम हा गुन्हेगारही नव्हता. आचलचे वडील गजानन मामीडवार यांनी त्याला फसवले. तीन वर्षांपूर्वी आचल आणि सक्षमच्या प्रेमसंबंधांविषयी समजले तेव्हा आचल अल्पवयीन होती. तेव्हा गजानन मामीडवर यांनी सक्षमने आमच्या मुलीवर बलात्कार केला, तो घरात घुसून आमच्या मुलीवर अत्याचार करतो, रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावतो, असे खोटे सांगितले. त्यामुळे सक्षमवर एमपीडी लागली होती, असे सक्षम ताटे याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

आणखी वाचा

जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं

‘सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन’; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट

आणखी वाचा

Comments are closed.