सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्
Nanded Crime: नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सक्षम ताटे (Saksham Tate) याचे कुटुंब तसेच त्याची प्रेयसी आचल मामीडवार (Anchal Mamidwar) हिच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. सक्षमच्या कुटुंबीयांनी तसेच विविध संघटनांनी दोघांनाही संभाव्य धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची (Police Protection) मागणी केली होती. या मागणीचा विचार करून पोलीस विभागाने सक्षमच्या कुटुंबियांना आणि आचल मामीडवार हिला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. सहा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, सक्षम ताटे याच्या संघसेननगर येथील घराबाहेर दोन-दोन पोलिसांची चार तासांच्या अंतराने ड्युटी ठेवण्यात आली आहे.
दि. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशी टाकून हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेमसंबंध आढळल्याने मुलीच्या वडिलांनी, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ही हत्या केली आहे. इतवारा पोलिसांनी आचल मामीडवार हिचे वडील, आई, दोन्ही भाऊ आणि इतर अशा एकूण आठ जणांविरुद्ध हत्या आणि अतिचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आंचलचे आई–वडील, दोन्ही भाऊ आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. घटनेपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे, यात आचलच्या एका भावाने मित्रासह सक्षमच्या घराची रेकी केल्याचे पाहायला मिळत आहे.
Nanded Crime: सक्षमच्या घरासमोर 24 तास सुरक्षा
या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने सक्षमच्या कुटुंबियांना आणि आचलला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे कुटुंबियांसह सामाजिक संघटनांनी सुरक्षा देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन दोन्ही कुटुंबांना सुरक्षा पुरवली आहे. सक्षम ताटे याच्या संघसेननगर येथील घरासमोर सहा शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले असून दोन-दोन कर्मचाऱ्यांची चार तासांची पाळी ठेवून अखंड सुरक्षा दिली जाणार आहे. दिवस-रात्र सतत पहारा राहावा, यासाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.