‘लवकर या, मी वाट बघतोय…’; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उच

नांदेड क्राईम न्यूज : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट (Kinwat) तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. आई-वडिलांची तीव्र ओढ आणि मानसिक अस्वस्थता यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

रानोजी विलास ऐनवलेवाड (20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नांदेड येथे बी. एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. रानोजीचे आई-वडील रोजगारासाठी तेलंगणा (Telangana) राज्यात गेले होते. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो गावी आला होता. बुधवारी सकाळी रानोजीने आपल्या भावाला नांदेडला परत जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार भावाने त्याला इस्लापूर येथे सोडले. मात्र, तो नांदेडला न जाता पुन्हा सहस्त्रकुंड परिसरात परतला. त्यानंतर दुपारच्या सुमारास सहस्त्रकुंड येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावून त्याने आपले जीवन संपवले.

Nanded Crime News: आत्महत्येपूर्वी भावनिक पोस्ट शेअर

घटनेपूर्वी रानोजीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आई-वडिलांची आठवण व्यक्त करताना लिहिले होते, “आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. मी घरी आहे, पण तुम्ही इथे नाही. लवकर या… मी वाट बघतोय.” ही पोस्ट केल्यानंतर सुमारे दोन तासांतच त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Nanded Crime News: कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, रानोजीने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून, तो मानसिक तणावात होता का, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime News: तंबाखू खायला न दिल्याने सटकली, डोक्यात लोखंडी पाईप मारत एकाला संपवलं, अकोल्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच रक्तरंजित थरार

Bhandup Bus Accident: रिव्हर्स गिअरमधील भरधाव बस गर्दीत शिरली, चाकाखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू, भांडूप अपघाताचे हादरवणारे CCTV फुटेज

आणखी वाचा

Comments are closed.