धुरंधरचा लेट नाईट शो, बुलेटवरुन घरी येताना दुसऱ्या गँगने घेरलं, तलवार-खंजिराने सपासप वार, ठाकरे

नांदेड गुन्हे बातम्या: नांदेडमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या अर्जितसिंघ चव्हाण याचाही समावेश आहे. अर्जितसिंघ चव्हाण हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल होते. अर्जितसिंघ चव्हाण शुक्रवारी रात्री आपल्या मित्रांसोबत नांदेडच्या ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये ‘धुरंधर’ (Dhurander) या चित्रपटाचा लेट नाईट शो पाहायला गेला होता. हा शो संपल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास अर्जितसिंघ चव्हाण (Arijitsingh Chavan) हा त्याच्या बुलेट गाडीवरुन घरी जायला निघाला. त्यावेळी ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्सच्या बाजूलाच असणाऱ्या एका मोकळ्या जागेपाशी आल्यावर साईलाला आणि अनिल पंजाबी या प्रतिस्पर्धी गँगच्या गुंडांनी त्याला घेरले. या सगळ्यांनी मिळून अर्जितसिंघ चव्हाण याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यावर खंजीर आणि तलवारीने वार करण्यात आले. अर्जितसिंघ चव्हाण यानेही प्राणप्रणाने या हल्ल्याचा प्रतिकार केला. यामध्ये प्रतिस्पर्धी गँगचे सय्यद आवेज सय्यद खलील (वय 27) हा गंभीर जखमी झाला. तर मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (वय 23) याचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे धारदार शस्त्रांनी वार होऊन शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने अर्जितसिंघ चव्हाण याचाही जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या भावाने त्याला रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. (Nanded Triple Murder case)

अर्जितसिंघ चव्हाण याच्या भावाने त्याला विष्णुपुरी येथील रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अर्जितसिंघ चव्हाणचे भाऊ आणि वडील दोघेही त्याचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात थांबले होते. नेमक्या त्याचवेळी अर्जितसिंघवर हल्ला करणाऱ्या आणि माराहाणीत गंभीर जखमी झालेल्या आवेज सय्यद खलील याला इतर कोणत्याही रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिल्याने त्यालाही विष्णुपुरी येथील रुग्णालयातच आणण्यात आले. ही गोष्ट या रुग्णालयात असलेल्या अर्जितसिंघच्या भावाला समजली. त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता, उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या आवेज खलीलवर आणखी एक वार केला. त्यामुळे गंभीर जखमी असलेल्या आवेजचा मृत्यू झाला. या तिहेरी हत्याकांडामुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे रुग्णालयात जखमी आरोपीवर हल्ला झाल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी आणि कायदा-सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आणखी वाचा

बेपत्ता व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह झुडपात आढळला; डोक्यावर वार करून संपवल्याचा संशय, नागपूर हादरलं!

माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?’ कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!

आणखी वाचा

Comments are closed.