सक्षमला मारण्याआधी त्याच्या घराची रेकी; CCTV फुटेज समोर; ‘त्या’ गल्लीतील कॅमेऱ्यात सगळं झालं कै


नांदेड : नांदेड जिल्ह्यात आंतरजातीय प्रेम प्रकरणात सक्षम ताटेची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली होती. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील जुनागंज भागात ही घटना घडली होती. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे, व्हिडीओ आणि दावे समोर आले आहेत, अशातच आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. सक्षम ताटेची निर्घृण हत्या करणारे मुलीचा आरोपी भाऊ आपल्या इतर सहकाऱ्यांसह सक्षम ताटे याच्या घराजवळ रेकी करत असल्याचं व्हिडिओमधून समोर आलं आहे. जवळपास पाच ते सहा तरुण या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळं राज्यभरातून हळहळ व्यक्त होत होती.

Nanded Saksham Tate Murder Case : नेमकं काय घडलं होतं?

नांदेडमधील सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधांना आंचलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. आंचलचे कुटुंबीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती तिने माध्यमांशी बोलताना दिली आहे. तिच्या वडीलांनी आणि भावांनी मिळून गेल्या आठवड्यात सक्षम ताटे याला गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येनंतर सक्षम ताटेच्या आईने आंचलचे वडील गजानन मामीडवार आणि भावांवर गंभीर आरोप केले आहेत. आंचलच्या भावांनी मध्यंतरी सक्षमला फक्त काटे असलेलं गुलाबाचे झाड भेट म्हणून दिलं होतं. तेव्हाच त्यांनी आधीच प्लान केला होता, असं सक्षमच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर हत्येच्या आधीचे त्याचे सोबतचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, एका मिरवणुकीमध्ये सक्षम ताटे आणि तरूणीच्या परिवारातील लोक एकत्रित नाचताना दिसत आहेत.

Nanded Saksham Tate Murder Case : आंबेडकर जयंतीमध्ये डिजे समोर डान्स

आंचलचे वडील गजानन हे आंबेडकर जयंतीमध्ये डिजे समोर डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ते आंचल, सक्षम आणि त्यांच्या मित्रांसोबत नाचताना दिसत आहेत. ते एकत्रित आनंदी दिसत आहेत. गजाननने यावेळी आपल्या मुलीला मिठी मारली. सक्षमचे मित्र आरोपीला खांद्यावर घेऊन डान्स करत असल्याचे दिसून आले.दरम्यान, आंचलने इतवारा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवरती गंभीर आरोप केले. त्या पोलिसांनी सक्षमची हत्या करण्यासाठी भावांना भडकावले असल्याचा आरोप तिने केला.

Nanded Saksham Tate Murder Case : सक्षम ताटेच्या हत्या प्रकरणातील सातवा आरोपी अटकेत

27 नोव्हेंबर रोजी सक्षम गौतम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशीने वार करून निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी सहा जणांना अटक केली होती. त्यातील चार जण 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी रात्री सातव्या आरोपीला अटक केली होती. त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सातवा संशयित आरोपी अमन देविदास शिरसे (वय 22 रा. माळटेकडी, नांदेड) याला अटक केली होती.

आणखी वाचा

Comments are closed.