आधी आई वडिलांना संपवलं, त्यानंतर दोन्ही भावांनी रेल्वेसमोर उड्या घेतल्या, नांदेड हादरलं
नांदेड क्राईम न्यूज : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आई वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन मुलांनीच मिळून आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार इथं घडली आहे. या हत्यानंतर दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलीस तपासात वेगळंच वळण
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार इथल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणाला पोलीस तपासात वेगळंच वळण मिळालं आहे. उमेश लाखे आणि बजरंग लाखे या भावंडांनी आपल्या जन्मदात्या आई वडील राधाबाई रमेश लाखे यांची हत्या केली आहे. या दोघांचीही गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर आरोपींनी मुगटला रेल्वेसमोर जात स्वतःला संपवले आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासानंतर मृत दोघा भावावर आई-वडिलांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक विवंचनेतून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने या घटनेनंतर समाजमन सुन्न झालं आहे.
महत्वाच्या बातम्या:
BJP Leader Nephew Murder Case: दुपारी मोठ्या भावाला दिली धमकी, संध्याकाळी लहान भावाला संपवलं; भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्येची थरारक कहाणी
आणखी वाचा
Comments are closed.