नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अ
नांदेड – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नांदेड जिल्ह्यात काँगेस आणि वंचितची युती होण्याची शक्यता आहे. दोन्हीं पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत. दरम्यान युतीबाबत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, अजून बोलणी झाली नाही, प्रस्ताव आल्यास पुढील दिशा ठरवू असं दोन्ही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांसोबत युती करण्याचे अधिकार पक्ष नेत्यांनी दिले. वंचित देखिल सेक्युलर पक्ष आहे असं काँगेसचे खासदार रविंद्र चव्हाण म्हणालेत. तर अज्ञाप आमची चर्चा झाली नाही. मात्र वंचितकडून तसा प्रस्ताव आला तर जिल्हाकार्यकारणी विचार करेल, प्रदेश काँगेसचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवू. वंचित काँगेससोबत आली तर सेक्युलर मतांची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल असं काँगेस खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले.
दरम्यान वंचितच्या राज्य कार्यकारणीने राज्यातील सर्व जिल्ह्यात भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष सोडुन युती करण्याचे अधिकार दिले आहेत. काँगेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी युती बाबत सकारात्मक्ता दाखवली असेल तर आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रीया वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहेमद यांनी दिली आहे. मात्र काँगेस पक्षाने खासदार चव्हाण यांना युती बाबत बोलणी करण्याचे अधिकृत अधिकार दिले आहेत का? कारण गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस काँगेसने युतीबाबत चर्चा केली, पण ती चर्चा पूर्णत्वास गेली नाही, तसं होऊ नये, ती काळजी घेणे गरजेचे आहे असा सल्ला देखील फारुख अहेमद यांनी दिला आहे. त्यांना वरिष्ठांनी आदेश दिले असतील तर चर्चेसाठी स्वागत आहे, त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर वरिष्ठांची मान्यता घेऊन त्यांना प्रतिसाद देऊ असं फारुख अहेमद म्हणालेत.
वंचितच्या राज्य कार्यकारणीने राज्यातील सर्व जिल्ह्यात भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष सोडुन युती करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी संबंधित गोष्टींचा विचार करून युतीबाबतचा प्रस्ताव दिला तर दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.