Nanded News – पाण्याच्या शोधात बिबट्याचा बछडा विहिरीत पडला, वनविभागाने केली सुखरूप सुटका
किनवट तालुक्यातील कनकी शिवारात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाच्या कर्मचार्यांनी व पोलिसांनी सुखरूप बाहेर काढून प्रथमोपचार करून जंगलात सोडून दिले.
तालुक्यातील मांडवी परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून पाण्याच्या शोधात बिबट्या मानव वस्तीकडे धाव घेत आहे. बुधवारी (11 फेब्रुवारी 2026) कणकी शिवारातील सूर्यकांत रेड्डी कल्यमवार यांच्या शेतातील विहीरीत एक बिबट्याचा बछडा अंदाजे वय ४ ते ५ महिने विहिरीत पडला. ही घटना बाजूच्या शेतात असणार्या शेतकरी दिनेश जाधव यांनी बघितली असल्याचे सांगितले. शेत मालकाला याची माहिती मिळताच त्यांनी या घटनेची माहिती वन विभागात दिले. माहिती मिळताच उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनरक्षक किरण चव्हाण व वनपरिक्षेत्रय अधिकारी संतोष शिरशेट्वार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल काझी, वन कर्मचारी व मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड व पोलीस कर्मचारी यांनी ताबडतोब घटनेच्या ठिकाणी जाऊन बिबटयाच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
बछड्यावर प्रथमोपचार करून जवळच्या जंगलात सोडून देण्यात आले. बिबट्याच्या बछड्याला सुखरूप काढण्याची यशस्वी मोहीम मसीयोदीन फयाजोदिन काझी वनपरिमंडळ अधिकारी पिंपळगाव, एन. एस. तायडे, वनरक्षक एस.आर गुजर, पोहेका. अस्वले, पो.का. मनीष ठाकरे, पो.क. जानकर, राजू डांगे, मांडवी पोलिस ठाण्यातील सर्व होमगार्ड, वनविभागातील यु.जी.सोनटक्के, वनमजुर सुरेश बनसोड, बि.बि. जाधव, जंगु संभा धुर्वे व गावातील वन्य पशुप्रेमी यांनी परिश्रम घेतले. तर किनवट तालुक्यातील आजची ही दुसरी घटना असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वस्तीकडे धाव घेत आहेत.
Comments are closed.