Nanded News – पोहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, इस्लामपूरातील हृदयद्रावक घटना
खड्यात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपूरा भागात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. मोहंमद अली मोहंमद इद्रीस (13), सय्यद इरफान सय्यद फिरोज (13), मोहंमद अदनान मोहंमद फिरोज (10) आणि आयान इब्राहिम बागवान (11) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
इस्लामपूरा भागातील मोकळ्या जागेत एका खड्यात पाणी साचलेले होते. शाळेची सुट्टी झाल्यानंतर चार अल्पवयीन मुले या खड्यात पोहण्यासाठी गेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान याठिकाणी महापालिकेमार्फत खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून नाल्याचे बांधकाम सुरु होते. संबंधित खड्डा नेमका कुणी व कसा खोदला? किती दिवसांपासून हे काम सुरु होते?, याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे, इतवारा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व जीवरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Comments are closed.