Nanded News – शासनाच्या फसव्या जीआरची शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी होळी
दुष्काळाच्या संदर्भात शासनाने काढलेल्या फसव्या जीआरच्या संदर्भात नांदेडमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी या फसव्या जीआरची होळी करत शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. कंधार, किनवट, देगलूर, मुखेड येथे तहसिल कार्यालयासमोर शासनाच्या जीआरची होळी करत निषेध नोंदवण्यात आला.
सरकारने 27 सप्टेंबर रोजी कोरडा दुष्काळ जाहीर केला. मात्र त्यासाठी काढलेल्या अध्यादेशात कुठेही असा ठोस दावा करण्यात आला नाही. सरकारने दुष्काळ जाहीर करूनही निकष आणि अटी अशा लावल्या आहेत की प्रत्यक्षात एकाही शेतकर्याला मदत मिळणार नाही, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. कोणतीही ठोस उपाययोजना, भरीव मदत जाहीर न करता कागदोपत्री घोडे नाचवून दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी जीआरची होळी करत निदर्शने करण्यात आली.
Comments are closed.