वाजेगाव सरकारी निधी घोटाळा; सरपंच जमील अहमदला बेड्या, दोन ग्रामसेवक फरार

>> विजय जोशी, नांदेड

जनतेचा पैसा म्हणजे स्वतःची खासगी जहागीर समजणाऱ्या भ्रष्ट सरपंचाचे धाबे आता दणाणले आहेत. नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीत तब्बल २ कोटी ८४ लाख रुपयांच्या शासकीय निधीवर डल्ला मारणाऱ्या सरपंच शेख जमील अहेमद याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा सरपंच एवढा निर्दयी निघाला की, त्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या नावेही पैसे लाटण्यास मागेपुढे पाहिले नाही. या महाघोटाळ्यात सहभागी असलेले दोन ग्रामसेवक मात्र सध्या ‘नॉट रिचेबल’ असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

वाजेगावच्या २०१० सरपंचपदाची खुर्ची १० वर्षापासून उबवणाऱ्या शेख जमील अहेमद याने ग्रामसेवकांच्या साथीने शासकीय तिजोरीला घरघर लावली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा २०१६ मध्ये शेख हुसेनाबी शेख मस्तान या महिलेचा मृत्यू होऊन चार महिने उलटले होते, तरीही त्यांच्या नावे १२ हजार रुपये उचलण्यात आले. मृत व्यक्तीच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा घृणास्पद प्रकार पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

लतीफ खॉन पीर खान पठाण या सजग पत्रकाराने या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला आहे. तक्रारीनुसार, या सरपंचाने दलित वस्ती सुधारणेच्या नावे शेख हनीफ नावाच्या मजुराच्या नावे चक्क १४ लाख २० हजार रुपयांचे धनादेश वटवले. पण प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही आणि हिशोबाचा ताळमेळ नाही! स्वतःच्या नावेही लाखो रुपये बँकांतून परस्पर काढण्याचा सपाटाच या महाशयांनी लावला होता. इतकेच नाही तर विरोधात जाणाऱ्या उपसरपंचांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांच्या खात्यात परस्पर पैसे जमा करून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थानही या टोळीने रचले होते.

तपासाचे रिपोर्ट कार्ड

● मुख्य आरोपी: सरपंच शेख जमील अहेमद (पोलीस कोठडीत)

● फरार आरोपी: ग्रामसेवक एस.एस. बोथीकर, एस.एस. देशमुख

● घोटाळ्याची रक्कम: २ कोटी ८४ लाख रुपये

● पोलिस कोठडी: ४ मे २०२६ पर्यंत

● थेट आरोप: मृतांच्या नावे उचल, निधीचा अपहार, बनावटगिरी

जिल्हा परिषदेच्या चौकशी अहवालात या २ कोटी ८४ लाख रुपयांच्या अपहारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि १२०-बी अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील भिसे, संतोष जाधव, रवी संकुरवार, ओमप्रकाश कवडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत सरपंच शेख जमीलला जेरबंद केले.

न्यायालयाने या ‘भ्रष्ट’ सरपंचाची रवानगी ४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. आता पोलीस कोठडीतल्या ‘पाहुणचारात’ आणखी काय काय प्रकरणे बाहेर येतात आणि फरार असलेले ग्रामसेवक पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेजिल्हा परिषदेच्या चौकशी अहवालात या २ कोटी ८४ लाख रुपयांच्या अपहारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच पत्रकार त् लतीफ खान पठाण यांची तक्रार या दोन्ही बाबीची पोलिसांनी दखल यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि १२०-बी अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील भिसे, संतोष जाधव, रवी संकुरवार, ओमप्रकाश कवडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत सरपंच शेख जमीलला जेरबंद केले. न्यायालयाने या भ्रष्ट सरपंचाची रवानगी ४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे

Comments are closed.