नांदेड हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णलयात भरती

नांदेड: मराठवाड्यातील महत्त्वाचं आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील शहर म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत नांदेडमधील गु्न्हेगारीच्या घटनांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नांदेड (Nanded) शहरात अवघ्या 3 दिवसांत तब्बल पाच खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांचा वचकच उरला नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यातच, आज पोलीस (Police) आणि आरोपींमध्ये थेट चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकरचा खून करणाऱ्या आरोपींना पकडताना पोलिसांवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.

शहराच्या श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (6 एप्रिल रोजी) पहाटे सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून तो शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी देखील आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सोनू कल्याणकरवर हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी गोळीबार केला, ⁠झरी गावात आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून प्रतिउत्तर देत त्यांच्यावर गोळीबार करत मुख्य आरोपीला केले. त्यानंतर, जखमी आरोपीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, ⁠एकूण 4 आरोपी होते, त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या गोळी लागलेला ⁠मुख्य आरोपी अंकुश गंधमवार रुग्णालयात आहे. तर, प्रसाद उर्फ ऋषी शिंदे, कृष्णा जोगदंड आणि रवी उर्फ रोहित लोट हेही खुनाच्या घटनेतील आरोपी आहेत.

पोलीस प्रशासन काम करत आहेत, आमचं सहकार्य राहील

नांदेड शहरात तीन दिवसात 5 खून झाले आहेत, ह्या 5 जणांच्या खुनामागे एक कारण पुढे आले आहे, ते जुन्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस प्रसाशनाचे आहे. आमचे प्रशासनाला पूर्ण सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया दिली. जे घडलं ते वाईट आहे, पोलीस कडक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. पोलिसांच्या कामात मी हस्तक्षेप करणार नाही, त्यांचे काम झाले कि मी नक्की त्यांना बोलावून घेणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा

काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा

आणखी वाचा

Comments are closed.