Nanded Waghala City Municipal Corporation Election – 81 जागांसाठी 1,203 एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागांसाठी १२०३ एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

आज सकाळी ११ वाजल्यापासून प्रशिक्षण हॉल एसटी महामंडळ वर्कशॉप नांदेड, श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम नांदेड, कामगार कल्याण भवन नांदेड, कापूस संशोधन केंद्र देगलूर नाका, उर्दू घर मदिना नगर, महाराजा रणजितसिंघजी मार्केट, सिडको येथील सात क्षेत्रिय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तसेच वेगवेगळ्या पक्षाच्या पक्ष निरीक्षकांची बी फार्म घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी रांगेत असलेल्या उमेदवारांना आत घेवून गेट बंद करण्यात आले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष असलेल्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह या सर्व कार्यालयावर एकच गर्दी केली होती. काल दुपारी तीन वाजेपर्यंत ३०२ अर्ज दाखल झाले होते. आज ९०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले एकूण ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण ८१ जागांसाठी १२०३ एवढे अर्ज दाखल झाले असून, उद्या दि.३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.

Comments are closed.