मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसाचा लाठीचार्ज
नंदूरबार : शहरात काही दिवसापूर्वी दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, येथील आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी (नंदबार) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले असून पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर, मोर्चात (Morcha) सहभागी झालेल्यांनी सैरावैरा धावपळ केल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी, पोलिसांनी (Police) घटनास्थळी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. या मारहाणीच्या घटनेतील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. नंदुरबार शहरात दोन युवकांच्या हाणामारीजिवंत विजय वळवी याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, यामुळे आदिवासी संघटना आता आक्रमक झाली असून, आज नंदुरबार शहर बंद ठेवत मूक मोर्चा काढण्यात याला आहे.
नेमकी घटना काय? (नंदबार लाँग मोर्च)
विजय वळवी याच्यावर सूर्यकांत मराठे या आरोपीने चाकूहल्ला करण्यात आला होता. या खाल्ल्यानंतर विजय वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे, जय वळवीचा खटला लवकर न्यायालयात चालवावा आणि जयवडवी याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आदिवासी संघटनेची आहे. त्याच अनुषंगाने आयोजित मोर्चात आरोपींना फाशीची शिक्षा द्याया मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं? त्यावेळी काही आंदोलकांनी दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान, आदिवासी संघटनेच्यावतीने नि: शब्द समोरदोनजिवंत आरोपींनाही कठोर शिक्षण, फाशीची झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा
एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, अधिकाऱ्यांनो पुण्य कमावयाची संधी परमेश्वराने दिलीय – भरणे
आणखी वाचा
Comments are closed.