Narayan Rane harsh reply to Prakash Mahajan criticism


मुंबई : नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही असे म्हणत राणेंची तुलना लवंग आणि वेलचीसोबत करणाऱ्या मनसे नेत्याला खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून त्यांनी मंत्री नितेश राणेंवर जहरी टीका केली. त्यामुळे आता नितेश राणेंचे वडील आणि खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावर नारायण राणेंनी एक पत्र पोस्ट केले असून प्रकाश महाजन कोण? ते किती वेळा निवडून आले? असे प्रश्न राणेंकडून उपस्थित करण्यात आले आहेत. (Narayan Rane harsh reply to Prakash Mahajan criticism)

खासदार नारायण राणे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पत्र पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, टीव्ही-9 च्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. राज ठाकरे आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात, त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? असे सवाल राणेंनी उपस्थित केले आहेत. तर, कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळाले, म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करू नये, एवढी तुमची कुवत नाही. नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे, असे राणेंनी पत्राच्या माध्यमातून म्हटले आहे.

हेही वाचा… Mumbra Accident : हक्काचे घर पाहण्यासाठी डोंबिवलीला निघाला अन्… मुंब्रा अपघातात मयुरचा मृत्यू

तसेच, निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेश यांना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा इशाराच नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना दिला आहे. तर, नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे. माझ्या जीवाचे काही बरंवाईट झाले तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.





Source link

Comments are closed.