नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी शिवाजी महाराज होते, भाजप खासदार संसदेत बरळला; संजय राऊत संतापले

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पूर्वीच्या जन्मतबळात भाजपचे खासदार म्हणतात: भाजप नेत्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत वादग्रस्त वक्तव्य केली होती. आता आणखी भाजपचा आणखी एक खासदार संसदेत बरळलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, असं वक्तव्य भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी केलंय. त्यानंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, त्यांचं हे वक्तव्य संसेदेच्या कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले आहेत.

नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी शिवाजी महाराज होते, भाजप खासदार बरळला

प्रदीप पुरोहित म्हणाले, मी ज्या क्षेत्रातून येतो. तो एक डोंगरी भाग आहे. तिथे गिरीजाबाबा नावाचे एक संत राहातात. त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी योग्य सांगितलं होतं. ते म्हणाले की, आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा पूर्वजन्म जो होता, त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आता त्यांचा दुसरा जन्म नरेंद्र मोदी म्हणून झालाय. त्यामुळे तेच भारताला सर्वांत शक्तिशाली राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका…शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.

असे लोक कुठून पैदा होतात? संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणाले, हे महाशय संसदेत संसदेत बोलत आहेत. नरेंद्र मोदींचा पूर्वजन्म जो होता, त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज होते, असं म्हणत आहेत. यांची भाजपा खऱ्या शिवाजी महाराजांना मानत नाही. त्यांची शिवाजी केवळ नरेंद्र मोदी आहेत. असे लोक कुठून पैदा होतात? भाजपने शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. माफी मागितली पाहिजे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार; 5 नवीन आमदार कोण?, पाहा यादी

अधिक पाहा..

Comments are closed.