Narhari Zirwal : घड्याळ हे अजित दादा पवार गटाचचं राहिल; नरहरी झिरवाळ यांना कॉन्फिडन्स
नारहरी झिरवाल, भंडारा: मी कसं सांगेल की घड्याळ चिन्ह आमचं राहणार नाही, ते आमचचं राहणार आहे. घड्याळ चिन्ह हे अजित दादा पवार यांच्या गटाटंचं किंवा अजित दादांच्या राष्ट्रवादीचचं राहील,असा ठाम विश्वास अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांनी व्यक्त केला आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते. विरोधकांकडून आरोप होत नसेल तर तो विरोधक कसा? सरकारकडून काही चुकीचं होत असेल आणि त्याच्यावर अंकुश ठेवणारा विरोधक असतो असंही झिरवाळ यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.
नरहरी झिरवाळ म्हणाले, विरोधकांचा आरोप तसा नसेल तर तो विरोधक कसा….असं म्हणत नरहरी झिरवाड यांनी वाल्मीक कराड यांना पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या विरोधकांच्या टीकेची हवा काढली. विरोधकांचा आरोप पहिले आहे की, मुंडेंचा राजीनामा घ्या. धनंजय मुंडे म्हणतात की, मी दोषी असेल तर राजीनामाचं काय तर फासावर जाईल. तरी विरोधक सांगतात की, राजीनामा द्या राजीनामा द्या. कृषिमंत्री कोकाटे यांचा 25 वर्षांपूर्वीचा फ्लॅटचा विषय आहे. एवढे दिवस ते आमदार होतेच. पण, मंत्री झाल्याबरोबर त्यांच्यावर आरोप होत आहे. विरोधकांनी कामकाजात होत असलेल्या त्रुटीबाबत सरकारकडून काही चुकीचं होत असेल, त्याच्यावर तो अंकुश ठेवतो त्याला विरोधक म्हणतात. हे आपला आता घरगुती सारखं चालू झालाय. त्याला काही आता अर्थ नसल्याचा टोला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांनी वाल्मीक कराड, धनंजय मुंडे आणि कोकाटेंवर विरोधक मांडत असलेल्या भूमिकेवर लगावलाय.
हिंगोली या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिल्यावरून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड हे सुरुवातीला नाराज होते. तसं त्यांनी बोलूनही दाखविलं होतं. मात्र, आता त्यांनी यावर यू टर्न घेतला आहे. एडिटिंग वगैरे करता हे सगळ्यात वाईट आहे, असं खापर झिरवाड यांनी माध्यमावरचं फोडलं. त्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना झिरवाड यांनी… मी सांगतानाचं असं सांगितलं होतं की, अनुशेष असलेला गरिबातील गरीब जिल्हा असं स्थानिक लोकं म्हणतात, तर मी का नाही म्हणू. मी गरीब आहे आणि या दोन गरिबांचा विचार करून जास्तीत जास्त फंड मिळेल हा उद्देश होता. म्हणून आताच्या बजेटला मी जे एक्स्ट्राचे पैसे मागितले, सगळेच्या सगळ्यांना मान्यता मिळाली. म्हणून मी गरीब सांगो की, कडकड करून सांगो…पण दोन रुपये जास्त मिळण्यासाठी माझा अट्टाहास असतो, असं स्पष्टीकरण नामदार झिरवाड यांनी दिलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.