नासाकडून सुपरसोनिक जेट विमानाची यशस्वी चाचणी

अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा कमी आवाज करणारे सुपरसोनिक विमान बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. नासाने नुकतीच सुपरसोनिक जेट विमानाची यशस्वी चाचणी केली आहे. हे विमान अत्यंत कमी आवाजात वेगवान उड्डाण करू शकते. याचा आवाज सर्वसाधारणपणे सुपरसोनिक विमानापेक्षा कमी आवाज आहे. या सुपरसोनिक विमानाला नासा आणि अमेरिकन एअरोस्पेस निर्माता कंपनी लॉकहीड मार्टिन दोघे मिळून बनवत आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटाच्या वर याचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.

1940 च्या दशकापासून विमान सुपरसोनिक वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे, परंतु या सुपरसोनिक विमानाच्या प्रचंड आवाजामुळे व्यावसायिक प्रवासासाठी यावर बंदी घालण्यात आली होती. ब्रिटिश एअरवेज आणि एअर फ्रान्सच्या सुपरसोनिक विमान कॉनकॉर्डने 1970 च्या दशकात अटलांटिकच्या वर उड्डाण सुरू केले होते, परंतु तीन वर्षांत झालेल्या दुर्घटनेनंतर आणि महागड्या सेवेमुळे याची सेवा थांबवण्यात आली. जर नासा आणि लॉकहिड मार्टिन सुपरसोनिक विमानाचा आवाज कमी करण्यात यशस्वी ठरले तर या सुपरसोनिक विमानाने न्यूयॉर्क शहर व लॉस एंजिल्स यादरम्यान लागणारा वेळ अर्धा वाचू शकतो.

Comments are closed.