वाह रे पाकिस्तान! आपल्याच हिरोला केलं व्हिलन; नसीम शाहवर क्रिकेट खेळण्यास लागणार बंदी…, मुख्य
पीसीबी ॲक्शन नसीम शाह : पाकिस्तानमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही. अजब-गजब निर्णय आणि अनपेक्षित घटनांसाठी पाकिस्तान ओळखला जातो. आता पुन्हा एकदा तिथे असाच एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आपल्या स्वतःच्या खेळाडूवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
यावेळी हा प्रकार पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याच्याशी संबंधित आहे. पीसीबी त्याच्यावर 1 ते 2 वर्षांचा बंदी घालण्याचा विचार करत आहे. इतकंच नाही तर त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही वगळले जाऊ शकते, ज्यामुळे त्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसू शकतो.
माजी क्रिकेटपटू म्हणून, गोष्टी शांत करण्याऐवजी, बासित अली आणि कामरान अकमल यांनी सरकारला नसीम शाह यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. ते त्याच्याबद्दल इतका द्वेष का करत आहेत? #नसीमशाह #HBLPSL #PSL11 pic.twitter.com/NQoMBjadla
— तहसीन कासिम (@Tehseenqasim) 28 मार्च 2026
नेमकं प्रकरण काय?
सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज या लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्या खेळाडूंनाही भेटल्या.
🚨 दोषी आढळल्यास नसीमला काय सामोरे जावे लागेल 🚨
– PKR 1M-5M दरम्यान दंड.
– 1-2 वर्षाची पीएसएल बंदी.
– केंद्रीय करारातून काढून टाकण्याची शक्यता.
– प्रकरण आणखी वाढले नाही तर सार्वजनिक माफीची शक्यता आहे.
– राजकीय वादामुळे ब्रँड डील आणि प्रायोजकत्व गमावण्याचा धोका pic.twitter.com/XrnGTDH14n
— SheR•ALI (@Sher__Ali) 28 मार्च 2026
याचदरम्यान नसीम शाहने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली. त्यात त्याने असा प्रश्न उपस्थित केला की, “यांना असा सन्मान का दिला जातोय जणू त्या लॉर्ड्सवरील क्वीन आहेत?” ही पोस्ट काही वेळातच डिलीट करण्यात आली आणि नंतर त्याचे अकाउंट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पीसीबीने हा दावा मान्य केलेला नाही.
पीसीबी करणार कारवाई?
या प्रकरणावरून पीसीबीने नसीम शाहला कारण दाखवा नोटीस बजावली आहे. त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 10 ते 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो, तसेच 1 ते 2 वर्षांसाठी PSL मधून बंदी घातल्या जाऊ शकते. तसेच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक माफी मागण्यास भाग पाडले जाऊ शकते. याशिवाय, या वादामुळे त्याच्या ब्रँड डील्स आणि स्पॉन्सरशिपवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच, हे प्रकरण आता केवळ एका सोशल मीडिया पोस्टपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते खेळाडूच्या करिअरवर मोठा परिणाम करू शकते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.