Nashik Accident – तोरंगण-खारपडी घाटात बस उलटली, एकाचा मृत्यू; 23 भाविक जखमी

त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन द्वारकाकडे जाणारी भाविकांची बस तोरंगण-खारपडी घाटात उलटली. यात एका भाविक महिलेचा मृत्यू झाला असून अन्य 23 जण जखमी झाले आहेत. सुखीबाई सिंग(62) असे मयत महिलेचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. जखमींना हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. सर्व भाविक मध्य प्रदेशातील रहिवासी असून नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर दर्शनाला आले होते. तेथे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण द्वारका येथे ज्योतिर्लिग मंदिरात दर्शनासाठी चालले होते. यादरम्यान तोरंगण-खारपडी घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.

अपघात ज्या ठिकाणी झाला तो परिसर दुर्गम जंगलाचा आहे. सुमारे अर्धा तास प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारी चेतन लोखंडे, मोहित मोरे आणि देवदत्त गदर मदतीसाठी आले.

Comments are closed.