रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, ना
नाशिक अपघात बातम्या: एक आनंदाचा कार्यक्रम, हसत-खेळत चाललेला प्रवास आणि घराची ओढ… पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं आणि एकाच कुटुंबातील नऊ जणांवर काळाने झडप घातली. दिंडोरीतील (Dindori) शिवाजी नगर (Shivajinagar) भागात शुक्रवारी रात्री एक भरधाव कार अनियंत्रित होऊन थेट विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत झाला असून, या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Nashik Accident News: नेमकं काय घडलं?
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या ‘इर्टिका’ कारने (क्रमांक MH15-JS-1053) घराकडे परतत होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजी नगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला.
Nashik Accident News: कार थेट विहिरीत कोसळली
यानंतर भरधाव कार थेट पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने कारचा शोध घेणं कठीण जात होतं. त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत आतील नऊही जणांचा श्वास थांबला होता.
Nashik Accident News: हसत्या-खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
मृतांमध्ये 32 वर्षीय सुनील दरगोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांचा समावेश आहे. विशेषतः या अपघातात 7 ते 14 वयोगटातील चिमुरड्यांचा समावेश असल्याने पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले होते. या घटनेमुळे इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणाने, याचा तपास पोलीस करत आहेत.
Nashik Accident News: मृतांची यादी
1. सुनील दत्तात्रय दरगोडे (वय 32)
2. रेशमा सुनील दरगोडे (वय 27)
3. आशा अनिल दरगोडे (वय 32)
4. गुणवती सुनील दरगोडे (वय 11)
5. श्रेयश अनिल दरगोडे (वय 11)
6. श्रावणी अनिल दरगोडे (वय 11)
7. सृष्टी अनिल दरगोडे (वय 14)
8. समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय 7)
9. श्रद्धा अनिल दरगोडे (वय 13)
(सर्व रा. इंदोरे, ता. दिंडोरी)
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.