लग्नाहून परतताना भीषण अपघात, नवरदेवाच्या भावासह तिघांचा करुण अंत; सहा वऱ्हाड्यांची प्रकृती गंभी

नाशिक अपघात: नाशिकच्या नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील पोखरी शिवारात शुक्रवारी इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात निफाड तालुक्यातील तिघे जण ठार झाले असून एक जण जागीच ठार तर दोघांचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नांदगाव येथे प्राथमिक उपचार करून निफाड, नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कासारी (ता.नांदगाव ) येथे विवाह समारंभ आटोपून नवरदेवाच्या भावासह त्याचे सात जण मित्र परिवारासह एका काळ्या रंगाची इर्टीगा कारमधून (क्रमांक MH 02 EE 2309)  पोखरी शिवारात येत असताना, नांदगावहून कासारीकडे जाणाऱ्या सिमेंट गोण्यांची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो (क्रमांक MH 41 AU 5316) ला समोरासमोर जोरदार धडक दिली.

सहा जणांवर उपचार सुरु

अपघात इतका भीषण होता की इर्टीगा कारमधील तुषार शरद काकड ( रा. जळगाव ता. निफाड ) याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. या सहा जणांना तातडीने नांदगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील निलेश शरद कराड (24 रा.जळगाव, ता. निफाड) व अक्षय दौलत सोनवणे (रा.जळगाव, ता. निफाड) या दोघांची प्रकृती चिंताजनकच होती. मध्यरात्री त्या दोघांचीही रुग्णालयात उपचार सुरू असतांना प्राणज्योत मालवली. तर इर्टिगा कालमधील इतर पाच प्रवाशांना निफाड, नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. या अपघाताप्रकरणी छोटा हत्ती वाहन चालक अमोल भिकाजी अहिरे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात इर्टिगा चालक असलेल्या वैभव वाल्मीक वेताळ यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहेत.

जळगाव फाटा येथे मायलेकाचा मृत्यू

दरम्यान, नाशिक येथून शिवडी (ता. निफाड) या आपल्या मूळ गावी येत असताना जळगाव फाटा येथे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर (एमएच 20 जीझेड 2333)ने आहेर कुटुंबीयांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात ज्योती अनिल आहेर (25) व मुलगा वेदांश अनिल आहेर (03) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल विश्वनाथ आहेर (29) व आरुष अनिल आहेर (05 वर्षे) जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिल विश्वनाथ आहेर हे पत्नी ज्योती आणि तीन वर्षीय बालक वेदांशसह शिवडीकडे येत होते. त्याच वेळी निफाडमधील जळगाव फाट्यावर मागून येणाऱ्या कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने मागे बसलेले ज्योती आणि वेदांश यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik Crime : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई

अधिक पाहा..

Comments are closed.