माजी महापौरांसह 54 जणांची भाजपमधून हकालपट्टी, नाशिकमध्ये इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, नेमकं क

नाशिक भाजप : नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election 2026) मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच भाजपने (BJP) शहराच्या राजकारणात खळबळ उडवणारी कारवाई करत माजी महापौरांसह तब्बल 54 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भाजपच्या नाशिकमधील इतिहासातील सर्वात मोठी हकालपट्टी मानली जात आहे.

Nashik BJP : पक्षविरोधी कारवायांवर भाजपचा कठोर पवित्रा

नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षशिस्त मोडून अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 20 माजी नगरसेवकांसह एकूण 54 जणांना भाजपने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे, या यादीत माजी महापौरांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Nashik BJP : ‘शंभर प्लस’च्या नाऱ्याने वाढली होती अपेक्षा

नाशिक महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतील मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. अनेकांना उमेदवारीचे आश्वासनही देण्यात आले. नगरसेवक पदाच्या 122 जागांसाठी तब्बल 1,077 इच्छुकांनी मुलाखती दिल्या, मात्र प्रत्यक्षात केवळ 122 उमेदवारी उपलब्ध असल्याने सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. याच टप्प्यावर महायुती होणार की नाही, याबाबतही संभ्रम होता.

Nashik BJP : युती तुटली, गोंधळ वाढला

अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केल्यानंतर भाजपचा स्वबळाचा मार्ग निश्चित झाला. भाजपने 118 उमेदवार जाहीर केले, मात्र याच दरम्यान एबी फॉर्मचा मोठा गोंधळ झाला. काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले, त्यामुळे नाराजी अधिकच वाढली. भाजपकडून इतर पक्षांतून आलेल्या 33 जणांना उमेदवारी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला.

Nashik BJP : पक्ष कार्यालयासमोर आंदोलन, शहराध्यक्षांना घेराव

बंडखोरी इतकी वाढली की, प्रभाग 13 मधील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालून निषेध म्हणून त्यांना गाजर देण्यात आले होते. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपने समेटाचे अनेक प्रयत्न केले, मात्र सर्व बंडखोरांना थांबवण्यात पक्षाला यश आले नाही. अखेर भाजपने कठोर भूमिका घेत हकालपट्टीची कारवाई केली.

Nashik BJP : पक्षशिस्त मोडल्याने कारवाई : सुनील केदार

या संदर्भात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे, तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे ही गंभीर पक्षशिस्तभंगाची बाब आहे. त्यामुळे संबंधितांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.”

Nashik BJP : हकालपट्टी झालेल्यांची नावे

या कारवाईत माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे व कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पुनम सोनवणे, मिरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे. रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडीत आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदीनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, रतन काळे, ऋषीकेश आहेर, ऋषीकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे, एकनाथ नवले यांचा समावेश आहे.

आणखी वाचा

Nashik Municipal Election 2026: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत MD ड्रग्जची एन्ट्री, गिरीश महाजनांचा शिवसेना महानगरप्रमुखांवर खळबळजनक आरोप, भर सभेत व्हिडीओ दाखवला

आणखी वाचा

Comments are closed.