नाशिकच्या महिलेने भोंदूबाबाला इंगा दाखवला, कन्झ्युमर कोर्टात खेचून नुकसान भरपाई मिळवली
नाशिक बातम्या: भूतबाधा, जादूटोणा, आजार दूर करण्याची ऑनलाइन जाहिरात करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका भोंदूबाबाला दंड ठोठावला असून महिलेनं पूजा विधीसाठी भरलेले पैसेही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बुवाबाजी करणाऱ्या विरोधात पहिल्यांदाच असा निकाल दिल्याने या निकालाला महत्व प्राप्त झाले असून अंनिसच्या लढ्याला बळ मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सोशल मिडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका बाबाची जाहिरात बघायला मिळाली. भूत बाधा, काळी जादू, जादूटोणा आणि कुटुंबातील सर्वांची आजारापासून एक दिवसात होम हवनच्या माध्यमातून सुटका करतो, असा दावा करण्यात आला होता. ही जाहिरात बघून महिलेने 2 लाख 51 हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून भोंदूबाबाच्या खात्यावर पाठवले आणि बाबाच्या सांगण्यावरून ऑनलाइन पूजा केली. मात्र, सांगितलेले विधी करूनही काहीच फरक पडला नसल्यानं महिलेने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच मानसिक आणि शाररिक त्रास झाल्याचा खटला दाखल करत व्याजासह 50 कोटी रुपयांची मागणी केली होती.
भोंदूबाबाला ठोठावला दंड
यावर सुनावणी देताना ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 50 हजार रुपयांचा दंड, शारीरिक आणि मानसिक त्रासपोटी 15 हजार, तक्रार अर्जासाठी आलेल्या खर्चाचे 7 हजार असे आणि बाबाच्या बँक खात्यात भरण्यात आलेल्या 2 लाख 51 हजार रुपयांची रक्कम महिलेला देण्याचे आदेश दिले आहेत. कानपूर मधील संतोष सिंग भरोदियायाच्या विरोधात निकाल देण्यात आला असून करोली बाबा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भोंदूबाबा विरोधात जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोण आहे करौली बाबा उर्फ संतोषसिंग भदोरिया ?
उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ असलेल्या करौली या गावात या महाराजाचा आश्रम आहे. 14 एकरात हा अनधिकृत आश्रम स्थित आहे. तथाकथित तंत्रमंत्र, जादुटोणा करण्यासाठी हा भोंदुबाबा कुप्रसिद्ध आहे. अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहे. शेतकरी नेता अशी ख्याती मिळाल्याने त्याने अनेक जमिनी हडप करुन नावावर केल्याचेही समजते. करौली येथील हा असाच जमीन बळकावून आश्रम तयार केला आहे. कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचा दावा तो करतोय. विरोध करणाऱ्यांना तो हाणामारी करतो. युट्युबवर देखील हा बाबा प्रसिध्द आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZX7HHDP6G9K
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.