भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई


नाशिक गुन्हे अजय बागुल यांनी अटक केली: गंगापूरच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागूल (Ajay Bagul), पप्पू जाधव व एका अन्य आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडे (Mama Rajwade) आणि इतरांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा हे अद्यापही फरार आहेत.

विसे मळा गोळीबारप्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते सुनील बागूल यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हजर होण्यापूर्वी राजवाडे यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत न्यायालयात तसा अर्ज सादर केला. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.

Ajay Bagul Arrested: अजय बागुलच्या मुसक्या आवळल्या

तर या प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल हा फरार होता. पोलीसांकडून अजय बागुल शोध घेतला जात होता. अखेर अजय बागुलच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अजय बागुल, पप्पू जाधवसह एकास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे  अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nashik Crime: ‘ऑरा’ बार गोळीबार प्रकरणातील आरोपी भूषण लोंढे अद्याप फरार

दरम्यान, आयटीआय सिग्नल परिसरात ‘ऑरा बार’बाहेर झालेल्या गोळीबारात रिपाइं पदाधिकारी प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे, भूषण लोंढे याच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल आहे. भूषण लोंढे सध्या फरार असून, त्याने वापरलेली वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच दोन वाहनचालकांनाही ताब्यात घेतले आहे. गोळीबारात वापरलेली रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ‘ऑरा’ बारवरील कब्जा आणि खंडणीची रक्कम तिप्पट करण्याच्या उद्देशाने लोंढे टोळीने हा गोळीबार घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik CP Sandeep Karnik: भाईगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई होणारच; फडणवीसांनी ‘फ्री हँड’ दिल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त काय-काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.