नाशिकमध्ये ‘त्या’ मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षका

नाशिक गुन्हा: मद्यधुंद अवस्थेत रविवारी मध्यरात्री रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरुण-तरुणींच्या टोळक्यावर अखेर पोलिसांनी (Nashik Police) कारवाई केली असून सात ते आठ जणांविरोधात गंगापूर रोड पोलीस ठाण्यात (Gangapur Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कारवाई करण्यास विलंब केल्याने गंगापूर रोडचे पोलीस निरीक्षक सुशील जमुडे (Sushil Jumde) यांची नियंत्रण कक्षात (Control Room) बदली करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ (Prasad Circle) एक क्लबमधून नाईट पार्टी करून मद्याच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘त्या’ युवतीसह युवकांवर गुन्हा

गंगापूरच्या पोलिसांशी हुज्जत घालत जप्त केलेली गाडीची चावी मागत पोलिसांनाच कायद्याचे धडे शिकविणाऱ्या या युवतीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नव्हती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर अशोक साळवे (30, रा. पवननगर, सिडको), वैशाली वाघमारे (नाशिकरोड) भूमी ठाकूर (19, रा. भाभानगर), आल्तमश शेख (वडाळागाव), दोन बाऊन्सर यांच्याविरुद्ध तसेच हॉटेलचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूरच्या पोलीस निरीक्षकांचीही तडकाफडकी बदली

पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep karnik) यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती, मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली.

https://www.youtube.com/watch?v=DTWHJFMC22E

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिकमध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास

Nashik Crime News : भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!

अधिक पाहा..

Comments are closed.