धक्कादायक… चार जणांनी डोक्यात दगड घालून विधीसंघर्षित मुलाला संपवलं; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक
नाशिक गुन्हा: नाशिक शहरात एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या कामटवाडे (Kamatwade) परिसरात दिवसाढवळ्या एका विधीसंघर्षित बालकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)
दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हत्या शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव किरण चौरे असे असून, तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. हल्ला करणाऱ्या चार तरुणांनी मिळून किरण चौरे याच्यावर दगडाने वार केले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
परिसरात भीतीचं वातावरण
या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत आहेत आणि मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पंचवटीतील ‘बंटी-बबली’ला बेड्या
दरम्यान,नाशिक शहरातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरत असलेल्या पंचवटीतील ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला गजाआड करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कारवाई करत त्यांच्या विरोधातील पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. सदर आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने विकून एक कार खरेदी केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी साडे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे मंगेश अशोक राखपसरे आणि निशा मंगेश राखपसरे (दोघे रा. अवधूतवाडी, पंचवटी) अशी आहेत. गेल्या काही दिवसांत शहरातील महामार्ग, ठक्कर बाजार, द्वारका आणि नाशिकरोड येथील बसस्थानकांवर प्रवाशांकडून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकचे हवालदार प्रशांत मरकड यांना माहिती मिळाली की, संशयित दाम्पत्य देवळाली कॅम्पजवळील संसरी गावात येणार आहे. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक रवींद्र बागूल आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.