बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं, इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअ

नाशिक गुन्हा: महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये शिकणारा गणेश भांगरे (20 रा. रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अक्षय मदन वरठे (21 रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अतिष राजकुमार वैद्य (पूर्ण पत्ता माहित नाही) यांनी मयत मुलीच्या गळ्यात हात घालून काढलेला फोटो इंन्स्टावर ठेवल्याने समाजामध्ये बदनामी झाली.

इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअर केला

ही बदनामी सहन न झाल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपी सोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते. या प्रकारामुळे मुलीवर मानसिक ताण निर्माण झाला होता. आरोपींनी फिर्यादीच्या मुलीचे इन्स्टाग्राम युजर आयडी व पासवर्ड वापरून तिचे सोशल मीडिया खाते उघडले. त्यानंतर, तिचा व आरोपी अक्षय वरठे याचा गळ्यात हात घालून काढलेला फोटो त्या इन्स्टाग्राम खात्यातून अक्षय वरठे याच्या इन्स्टाग्रामवर पाठवून तो तिचा बॉयफ्रेंड आहे, असा मजकूरसुद्धा लिहून फोटो पोस्ट केला. त्यामुळे मुलीची समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी झाली.

सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवून मानसिक छळ

त्यानंतर गणेश भांगरे नामक व्यक्तीने मुलीला फोन करून अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे, तिच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवून तिचा मानसिक छळ केला. या सर्व प्रकारांच्या एकत्रित परिणामामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : 28 धारदार चाकू, कोयता, मिरची पूडसह आखला दरोड्याचा प्लॅन, पोलीस पाटलाने टीप दिली अन्…; नाशिकमध्ये चौघांना बेड्या

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; नाशकात पाच जणांच्या टोळीकडून लाखोंचा गंडा

आणखी वाचा

Comments are closed.