प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतल
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Manisha Jejurkar) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी आपल्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली.
Nashik Crime News: आत्महत्येचे कारण अस्पष्ट
डॉ. मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात परिचित नाव मानल्या जात होत्या. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबात अशी दुर्दैवी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Nashik Crime News: नाशिकमध्ये हळहळ
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. गंगापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या परिचितांकडून आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.