नाशिक हादरलं! मांत्रिकाकडून महिलेवर 14 वर्षे लैंगिक अत्याचार, 50 लाख रुपये उकळले


नाशिक क्राईम भोंदू बाबा : नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील एका मांत्रिकाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत भोंदूबाबाने (Bhondu baba) एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण (Sexual Assault) करून तब्बल 50 लाखांची तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश जगताप नामक भोंदू बाबा विरोधात इंदिरा नगर पोलीस (Nashik Police) ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बंगला घेऊन देतो’, ‘फ्लॅट मिळवून देतो’, ‘जमिनीतून सोने काढून देतो’, ‘पैशांचा पाऊस पाडून देतो’, अशा एक ना अनेक खोट्या आश्वासनांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांकडून सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक करत भोंदू बाबाने तिचे लैंगिक शोषण केले आहे. (Nashik News)

या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गणेश जगताप हा भोंदू बाबा अद्याप फरार असून इंदिरानगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र, याआधी देखील या भोंदू बाबाच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र, पुन्हा ह्या गणेश जगताप नामक भोंदू बाबाचा आणखी एक प्रकार समोर आल्याने पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात आता नाशिक पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Nashik Crime News: ‘तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो’, भोंदूबाबाकडून महिलेवर दबाव

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ‘तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो’, असे सांगत भोंदू बाबाने महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. पोलिसांना सापडलेल्या एका पुस्तकात महिलेच्या पतीचे आणि मुलांची नाव लिहली होती. तू माझ्यासोबत शरीरसंबंध नाही ठेवलेस तर पुस्तकातील एकाचा बळी जाईल, असे सांगून हा भोंदूबाबा महिलेला धमकावत होता. 2010 पासून आतापर्यंत अनेकदा त्याने महिलेवर शारीरिक अत्याचार केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा

हृदयद्रावक! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; 24 वर्षीय नराधमाला बेड्या, नाशिकचे मालेगाव घटनेनं हादरलं!

आणखी वाचा

Comments are closed.